नवभारत कन्या विद्यालयात भरली 'आनंदाची शाळा
नवभारत कन्या विद्यालयात भरली 'आनंदाची शाळा'
मूल तालुक्यातील नामांकीत नवभारत कन्या विद्यालयात आज आगळी—वेगळी 'आनंदाची शाळा' भरविण्यात आली. दप्तरविना शाळा, तणावविरहीत शिक्षण देण्याकरीता नवभारत कन्या विद्यालयाने आजपासून 'आनंदाची शाळा' हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला विद्यार्थीनींनी उत्सुर्त प्रतिसाद दिला.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार यांचे उपस्थितीत ही शाळा भरविण्यात आली. शिक्षण हे आनंददायी आणि तणावविरहीत असावे हा उद्देश ठेवून 'आनंदाची शाळा' सुरू करण्यात आल्याचे मत श्रीमती राजमलवार यांनी व्यक्त केले.
या शाळेत विद्यार्थानी, गाणी, गोष्टी, नकला, शायरी सादर केली. पारंपारीक कोडी, म्हणी सादर केले. विद्यार्थी आणि शिक्षकांनी गाणी, जादूचे प्रयोग सादर करून, विद्यार्थीनीचे मनोरंजन केले. सामुहीक डब्बा पार्टी करण्यात आली. गणितीय खेळ घेण्यात आले. आनंदाची शाळा उपक्रमांची संकल्पना शिक्षक विजय सिध्दावार यांनी यावेळी स्पष्ट केली.
विद्यालयाचे पर्यवेक्षक छत्रपती बारसागडे, जेष्ठ शिक्षक दिनेश जिड्डीवार, मिलींद रामटेके, कार्तिक नंदुरकर, धिरज नौकरकर, संतोष गवारकर,शैलेश देवाडे, राकेश नखाते यांनी आनंदाची शाळा उपक्रमात सक्रिय सहभाग घेत विद्यार्थाना ज्ञान व मनोरंजन दिले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!