.श्री.मल्लाजी आत्राम कला महाविद्यालय, जारावंडी येथे मा. दिपक दादा आत्राम माजी आमदार यांच्या हस्ते नेटबॉल व कबड्डी मैदानाचा उद्दघाटन सोहळा संपन्न




स्व.श्री.मल्लाजी आत्राम बहुउद्देशीय संस्था तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारा सलग्नित स्व.श्री.मल्लाजी आत्राम कला महाविद्यालय जारावंडी येथे मा. दिपकदादा आत्राम यांनी नेटबॉल व कब्बडी मैदानाचा उद्द्घाटन करून विद्यार्थांना मार्गदर्शन केले.तसेच त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यानी आपल्या सुप्त गुणाला व्हावं द्यावा.क्रिडा क्षेत्राचा माध्यमातून फक्त जिल्हा स्तरीय नाही तर राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन एक आदर्श निर्माण करावा.स्व.श्री. मल्लाजी आत्राम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भारत राष्ट्र समितीचे नेते, माजी आमदार तथा विभागीय अध्यक्ष आविस मा. दिपक दादा आत्राम यांनी महाविद्यालयात उपस्थित राहून सांगितले.या प्रसंगी संस्थेचे सचिव मा. अनिता आलाम , गोंडवाना  स्व.श्री.मल्लाजी आत्राम कला महाविद्यालय जारावंडी प्रा.राजेश बसवेश्वर हजारे, उमेश मोहूर्ले, सुधाकर ठेकाम, रमेश दुग्गा,जुलेख शेख, विनोद कावेरी श्रीकांत चीप्पावर, मिलिंद मोहुर्ले   अजय शडमेक, ज्ञानेश्वर चौधरी इत्यादी उपस्थित होते. आणि सर्व विद्यार्थ्यानी याप्रसंगी दिपक दादा आत्राम साहेबांचा सन्मान व सत्कार केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!