सोयाबीन पिकावर करपा,बुरशी रोगा मुळे शेतकरी देशोधडीला राज्यकर्त्यांची आश्वासनांची खैरात;पण प्रत्यक्षात शेतकऱ्याना काय भेटणार - विनोद उमरे प्रहार सेवक


उप संपादक
विलास मोहिनकर

चंद्रपूर : - यावर्षी पावसामुळे सोयाबीन पिकावर करपा बुरशी रोगामुळे सोयाबीन  पिक पूर्ण पणे हातुन निघुन गेले आहेत.या परिस्थितीतून शेतकरी देशोधडीला लागल्याच्या मार्गावर असून केलेला खर्चही मिळतो का नाही? याकडे शेतकरी बघत आहेत या परिस्थितीत राज्यकर्ते आश्वासनाची खैरात वाढत असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरात काय पडणार ?असा प्रश्न प्रहार सेवक विनोद उमरे यांनी उपस्थित केला आहे.
सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोग व  लागलेल्या शेंगांची गळती होत आहे उत्पादन हे एकमेव शेतकऱ्यांना जीवन जगण्याचे साधन असलेल्या शेतकरी देशोधडीला लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे हा प्रश्न गंभीर बनला आहे.प्रत्येक वर्षी हीच परिस्थिती असून कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ याचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे यावर्षी अती रोगराईमुळे सोयाबीन पिक हातुन निघून गेले आहेत. पंधरा दिवसात सोयाबीन पीक पूर्ण पणे हातून निघुन गेले आहे. शेतकऱ्यांपुढे  मोठे संकट उभे राहिले आहेत राज्यकर्त्यांची आश्वासनांची खैरात झटकत असल्या तरी प्रत्येक शेतकऱ्यांना काहीच दिलासा मिळालेला नाही. यापुढे तो मिळेल याची शक्यता पावसाच्या कागदपत्रे वाढलेल्या आकडेवारीतून दिसून येते.
केलेला खर्चही निघणे नाही. सोयाबीन पिकावर करपा,बुरशी  रोगामुळे शेंगा आहेत परंतु त्यामध्ये दाणे नाही काय शेंगांमध्ये दाणे असले तरी त्याची वाढ नाही त्यामुळे पिकात उत्पादन मिळणे दुरच परंतु केलेला खर्च सुद्धा निघतो की नाही? एवढी भयानक परिस्थिती आहे.
सरकार कोणाचेही असो, खुर्चीवर बसलेले राज्यकर्ते आश्वासनाची खैरात करत आहे.सरकार शेतकऱ्यांचे आहे. विकास कामासाठी आम्ही एकत्र आलो असे सांगतात सध्याचे राजकारण देखील यापेक्षा दुसरे काही सांगता येत नाही. मात्र सध्याची परिस्थिती आणि सरकारची घोषणाची वाऱ्यावरची आहे.परिस्थितीत शेतकऱ्यांना काही मिळाले नाही.  राज्यकर्ते किती घोषणा करत असली तरी पदरात काहीच पडत नसल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये सरकारच्या विरोधात संतांची लाट पाहायला मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!