शेतकऱ्यांचे पंचनामे करून विम्याचे पैसे वेळीच मिळाले नाही तर युवक काँग्रेस तर्फे शेतकऱ्यांना घेऊन जोडे मारो आंदोलन करणार - नागेंद्र चट्टे अध्यक्ष युवक काँग्रेस
उप संपादक
विलास मोहिनकर
चंद्रपूर : - शेतकरी नैसर्गिक संकटांत सापडला असून ,सध्याच्या परिस्थितीत शेजाऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.सत्तेतील पक्षातील लोक केवळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटोशेशन करतांना बातम्यांमधून दिसून येत आहेत,शेतकऱ्यांचे उत्पन्न दाम दुप्पट करण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने सोयाबीन पिकावर आलेल्या रोगांचे साधे पंचनामे सुद्धा करवून घेतले नाही,शेतकरी हा अशिक्षित घटक असून तो फक्त आपल्या अनुभवाने शेती पिकवतो,त्याला पिकावर येणाऱ्या नवीन रोगांविषयी विशेष माहिती नाही,अश्या वेळी शेतकऱ्यांच्या सेवेत असणारे शासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरून रोगांविषयी माहिती देण्याचे साधे कष्ट अधिकारी करीत नाही शेतकऱ्यांना रोगावर वेळीच उपाय योजना माहीत झाली असती तर शेतकरी आज उघड्यावर पडला नसता, शासकीय निधीचा पैसा शेतकऱ्यांना तारू शकत नाही,कुठे लाख रुपयाचे उत्पन्न आणि कुठे दहा हजाराची मदत धिक्कार असो या सरकारचा,शेतकऱ्यांचे पंच नामे करून वेळीच मदत केली नाही,तसेच विम्याचे पैसे वेळीच मिळाले नाही तर युवक काँग्रेस तर्फे शेतकऱ्यांना घेऊन जोडे मारो आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक कांग्रेस चे अध्यक्ष नागेंद्र चट्टे यांनी दिला.यावेळी अक्षय लांजेवार, अक्षय नागरीकर,राकेश साठोने,गणेश दहिकर, राहुल पिसे,मंगेश रंदई,प्रवीण जिवतोडे, अमित मोदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!