भाजप नेते प्रशांत बोबाटे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप




मूल

मूल शहरातील भाजप नेते ट्रान्सपोर्ट व्यावसायिक तसेच क्रिकेटपटू सामाजिक कार्यकर्ते कुणबी समाजाच्या कार्यासाठी नेहमी तत्पर असणारे प्रशांत बोबाटे यांच्या वाढदिवसानिमित्त मूल उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले. भाजप युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात यांचा वाढदिवस साजरा केला.फळे वाटप कार्यक्रमात प्रशांत बोबाटे यांच्या समवेत त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका विद्याताई बोबाटे, गौरव पिल्लारवार, प्रशिक घोगरे, चिंकू निकोडे, उदय झाडे,जगदीश रोहनकर, वंश बोबाटे, अभी चौकुंडे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशांत बोबाटे हे नेहमीच अनेक कार्यक्रमात सहभागी होत असतात कुणीबी समाजाच्या कार्यक्रमांमध्ये स्वतः सहभाग घेऊन निस्वार्थ आपल्या मित्रांच्या सहवासाने अनेक सामाजिक तसेच समाजाचे काम करीत असतात.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!