चिधिंचक प्रवासी निवारा बांधकाम कासवगतीने
तळोधी (बा.) नागभिड - तळोधी या महामार्गावरील चिंधीचक प्रवाशी निवारा बांधकाम गेले वर्षभरापासुन सुरू असुन अजुनही अर्धवट बांधकाम असल्याने प्रवासांना इतरत्र आधारासाठी भटकावे लागत असल्याने प्रवासी वर्गात नाराजीचा सुर असल्याचे दिसत आहे. मागिल वर्षी या महामार्गाचे मजबुतीकरण करण्यात आले. त्यामुळे या महामार्गावरील सर्व जुने असलेले प्रवासी थांबे मोडकळीस आले. त्यामुळे सर्वच बसस्थानकावर नविन प्रवासी थांब्यांचे बांधकाम आमदार निधीतून सुरू करण्यात आले. मात्र अनेक ठिकाणचे बांधकाम अर्धवट असुन काही. ठिकाणी लेवल काम, टिनाचे छत,समोरील मैदान जागा, बैठकस्थान, आदी कामे अर्धवटच असल्याने प्रवाशाना उन्हं वारा पाऊस या पानटपऱ्याचा किंवा झाडांचा आधार घ्यावा लागत आहे. एकंदरीत शासन जनतेच्या हिताचे काम करतं असल्याचा कांगावा करत असले तरी लाहान-लहान गोष्टीकडे दुर्लक्ष करून जनतेस वेठीस धरण्याचे काम करिता असल्याचे यांवरून दिसुन येते आहे. या परिसरातील चिंधिचक, जनकापूर, पळसगाव, येथिल प्रवासी थांबे त्वरित पुर्ण करण्यांत यावे असी मागणी प्रवासी वर्गाने केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!