चिमूर शहरातील मुख्य रस्त्यावर धुळीचे साम्राज्य
व्यापारी मंडळ स्थानिक नागरिकांना होतोय नाहक त्रास
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर ते वरोरा जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे.या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांसह वाहनचालक व नागरिक हैराण झाले आहेत. या रस्त्यावर सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याचे सांगत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग काम करणारे ठेकेदार जबाबदारी एकमेकांवर झटकत असल्याचे दिसून येत आहे. सध्या या रस्त्याच्या दुरुस्तीचे व काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या कामांमुळे रस्त्यावरील प्रचंड धूळ उडत असून या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर उडणाऱ्या या धुळीकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाबरोबरच प्रशासन तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना व प्रवाशांना या धुळीतूनच प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावरुन उडणार्या धुळी मुळे नागरिकांना श्वास घेणे मुश्किल झाले आहे. खास करून या धुळी मुळे दमा,खोकला,सर्दी आणि श्वासनांच्या विकाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर धावणार्या वाहनांमुळे सम्पूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सतत उडणार्या या धुळीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या ठिकाणी धुळीचा त्रास जास्त आहे. त्यामुळे या रोडवरील इमारतीत राहणार्या रहिवाशांना दारे खिडक्या चोविस तास बंद ठेवाव्या लागत आहेत. मार्गावरील सर्व इमारतीत राहणार्या नागरिकांना या धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी यांचेही दुर्लक्ष होतांना दिसत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!