श्री.विनोदभाऊ बोरकर मित्र परीवार व श्रीलक्ष्मी नागरी पतसंस्था गिरगाव,जतन फाऊंडेशन पुणे यांचे संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन...!
तळोधी ***** स्थानिक गिरगाव येथील युवा काँग्रेस नेते तथा श्रीलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.विनोद बोरकर व श्रीलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था,जतन फाऊंडेशन पुणे यांचे संयुक्त विद्यमाने दि.9/05/2023 ला सकाळी 8 वाजता जि.प.शाळेत मोफ़त नेत्रतपासणी करून लगेचच चश्मे वाटप होणार आहेत.
श्री.विनोद बोरकर हे स्थानिक गिरगाव येथील श्रीलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आलेले आहेत.सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासत,त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून सर्वसामान्य लोकांना सहकार्य केले आहे.
२-३ वर्षांअगोदर कोरोना रोगाचे संकट संपूर्ण देशावर असतांना त्यांनी गावातील वृध्द,अंध,अपंग लोकांना स्वखर्चातुन जेवणाचा डब्बा घरपोच पोहचविण्यासाठी व्यवस्था केलेली होती,गावात अनेक लोकांना मास्क वाटप केलेले होते.या अगोदरही त्यांनी पुढाकार घेऊन रोगनिदान शिबिराचे आयोजन करून गोर-गरीब जनतेचे पांग फेडण्याचे कार्य सतत त्यांचे हातून होत असते. संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष असतांना त्यांनी नागभीड तालुक्यातील अनेक वृध्दांना,निराधार लोकांना सरकारी योजनेचा लाभ मिळवून दिला.
मुळातच लहानपणापासून सहकार क्षेत्रात काम करीत असल्यामुळे सामान्य लोकांच्या काय अडचणी असतात हे त्यांनी अगदी जवळून पाहिल्यामुळे सर्व सामान्य माणसाला त्याचा लाभ व्हावा यासाठी त्यांनी या नेत्रतपासणी व मोफत चष्मेवाटप आयोजन केले असून संपूर्ण नागभीड तालुक्यात साधारणत: गरजू लोकांना 10000 लोकांची मोफत नेत्रतपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
श्री.विनोद बोरकर हे श्रीलक्ष्मी पतसंस्थेत अध्यक्ष म्हणून काम करतांना संचालक मंडळ,कर्मचारी वर्ग,संस्थेचे सभासद यांना विश्वासात घेऊन लोकोपयोगी उपक्रम राबवित असतात,त्यामुळेच त्यांना तिसऱ्यांदा बिनविरोध अध्यक्षपद मिळाले हे विशेष.
त्यांनी या शिबिराबाबत नागभीड तालुक्यातील अनेक गावांत शिबिर घेण्याचे ठरविले असून या शिबिराचा जास्तीत जास्त संख्येनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!