महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे अहेरी येथे अन्नदान संपन्न.
समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत *महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे शुक्रवार दिनांक ५ मे २०२३ रोजी अहेरी येथील बाल विकास मधील मूलांसाठी अन्नदान करण्यात आले*.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन, असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी न्यासाच्या वतीने *सौ. मिना बिरेल्लीवार आणि सौ .गिता कोंतमवार* यांनी परिश्रम घेतले . या उपक्रमासाठी *श्री .प्रदिप बिरेल्लीवार* यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
*या उपक्रमाचा लाभ एकूण १७ मुलांनी घेतला* .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!