ठाणेदार भोयर यांच्या कारवाई मुळे अवैध दारू विक्रेता व वाळू तस्कर धास्तावले
तळोधी बा:
येथील पोलीस स्टेशन ठाणेदार दिनकर शेंडे साहेब यांची तडकाफडकी बदली चंद्रपूर येथे झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील ठाणेदार मंगेश भोयर यांनी तळोधी बा. पोलीस स्टेशन चा पदभार सांभाळले असून कायदा सुव्यवस्था नियंत्रित राखण्यासाठी स्वतः ठाणेदार मंगेश भोयर अहोरात्र परिसरात होणारे अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी फिरत असल्यामुळे अवैध धंदे वाले धास्तावले आहेत.
या पोलीस स्टेशन अंतर्गत ४२ गावे येतात. तळोधी बा., वाढोणा, गिरगाव, सावरगाव, गोंविदपुर व परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री केली जात होती. तसेच रात्रीच्या वेळेस ट्रक्टर ने अवैध वाळू उपसा करून तस्करी केली जात होती. मात्र ठाणेदार मंगेश भोयर हे स्थानिक गुन्हे शाखेतून आले असल्याने त्यांना कामाचा चांगले अनुभव असल्याने ते अवैध धंदे वाल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतः पेट्रोलिंग करून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. या पोलीस स्टेशन मध्ये कर्मचारी संख्या अपुरी असताना सुध्दा ४२ गावाचा नियंत्रण ठेवण्यासाठी ठाणेदार मंगेश भोयर सक्षम आहेत. ते पदभार सांभाळले पासून अवैध वाळू तस्कर व अवैध दारू विक्रेते तळोधी बा. पोलीस स्टेशन कडे घिरट्या मारताना दिसून येतात. मात्र नागरिकांकडून ठाणेदार मंगेश भोयर अवैध दारू व वाळू तस्कर यांच्या वर कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केल्या जातात. मात्र त्यांचे पदभार सांभाळले पासून होत असलेल्या कारवाई मुळे अवैध धंदे वाले धास्तावले दिसून येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!