मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रमला बालकांच्या आनंदात,, विद्यार्थ्याना वाटल्या स्कूल बँग
वरोरा... जगदीश पेंदाम
ताडोबातील पट्टेदार वाघ जगप्रसिद्ध असून. देश विदेशात ताडोबाची महती पोहचली आहे. ताडोबात आल्यानंतर हमखास वाघाचे दर्शन होत असून ताडोबातील झुनाबाईचे प्रेमात पडलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे गुरुवारी सायंकाळी पाचव्यांदा ताडोबात आगमन झाले. सचिन सोबत पत्नी अंजली व मित्र आले असून त्यांनी आज दुपारला चिमूर तालुक्यातील आलिझंझा जिल्हा परिषद शाळेला भेट देत विद्यार्थ्याना स्कूल बग वाटप केल्या,
जिल्हा परिषद शाळा अली झंजा येथे आगमन होताच शाळेच्या वतीने गेटवर औक्षवंत करण्यात आले. शाळेमध्ये प्रवेश करताच मुलांनचे चेहरे प्रफुल्लित बघायला मिळत होते, मुख्याध्यापक रमेश बदके. सहाय्यक शिक्षिका मनीषा बावनकर. वैशाली ना. रवींद्र उरकुडे. देविदास बावनकर यांनी सचिन तेंडुलकर व अंजली तेंडुलकर यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले, या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ने विद्यार्थ्यांसोबत हित गूज करीत असताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मुलांसोबत हित गूज करीत असताना सचिन तेंडुलकर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्याना स्कूल बग व नोट बुक स्वतः वाटप केले, वर्ग चौथी मधील विद्यार्थिनी सृष्टी रघुनाथ मेश्राम यांनी सचिन बद्दल त्यांच्या मनातील भावना जाणून घेत शालेय वि्यार्थ्यांनसोबत काही क्षण घालवल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अलिझंजा गेटने ताडोबा जंगलात निघून गेले. बुद्ध पौर्णिमेला होणाऱ्या निसर्गानुभवात सहभागी होण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.....




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!