स्वाब' संस्थेने दिले परिसरातील सात वेगवेगळ्या सापांना जीवदान.
तळोधी (बा.);
तळोधी वन परिक्षेत्रातील कार्यरत पर्यावरण प्रेमीे संस्था 'स्वाब' च्या सदस्यांनी या आठवड्यात परिसरातील वेगवेगळ्या सात वेगवेगळ्या विषारी व बिनविषारी सापांना पकडून सुरक्षित जंगलात सोडून जीवदान दिले.
पावसाळ्याच्या दिवसात संपूर्ण परिसरामध्ये सापांचे दिसण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात हे साप जास्त प्रमाणात निदर्शनास येत नाही. परंतु या आठवड्यात पावसाळ्या प्रमाणे सतत पाऊस सुरू आहे त्यामुळे पावसाचे पाणी बिळात गेल्याने व सुकलेली जागेच्या शोधात साप मोठ्या प्रमाणात घरात घुसतात. घरात व घर परिसरात दिसणाऱ्या सापांना पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम हे सर्पमित्र नेहमीच करत असतात.
त्यामुळे जिवाच्या आकांताने परिसरातील सर्पमित्रांना लोक पाचारण करतात. व नंतर सर्पमित्र जीवाची परवा न करता व शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसताना सुद्धा वेळेवर जाऊन या सापांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून त्यांचे जीव वाचवण्याचे कार्य करत असतात.
तळोधी बा. परिसरात स्वाब संस्थेचे सदस्य सर्पमित्र, जिवेश सयाम, महेश बोरकर, अध्यक्ष यश कायरकर यांनी अशाच प्रकारे आलेल्या काॅल वर आपले कर्तव्य समजून परिसरातील तळोधी,वाढोणा, वलनी, कन्हाळगाव, सावरगाव, चिखलगाव, अशा वेगवेगळ्या गावांमधील सापांना पकडून त्यांची तळोधी वनविभागात नोंद करून परिसरातील जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडले.
नाग, घोणस, मण्यार, धामन, डुरक्या घोनष, अशा सापांना पर्यावरण मुक्त करन्यात आले. या वेळी, तळोधी चे क्षेत्र सहाय्यक वाळके, वनरक्षक एस. बी. पेंदाम, वनरक्षक कुळमेथे, हे उपस्थित होते.
" ऊन्हाळ्याचे दिवस आहे आणि त्यातही लग्न सिझन सुरू असल्याने घरी पाहुणे असताना गाव खेड्यात जमिनीवर व अंगणात झोपण्याची व्यवस्था केली जाते, मात्र पावसाचे पाणी बिळात गेल्याने व सुकलेली जागेच्या शोधात साप मोठ्या प्रमाणात घरात घुसतात यामुळे सुरक्षेसाठी जमिनीवर झोपु नये, प्रामुख्याने मन्यार साप रात्री साप,पाली, उंदीर, यांच्या मागे घरात घुसतात व झोपेत असताना चालल्याचे घटना घडतात व मन्यार झोपेत चावल्यानंतर निदर्शनास येत नाही. व पेशंट मृत झाल्याच्या घटना घडतात. यामुळे खाली जमिनीवर झोपन्याचे टाळावे." - यश कायरकर, अध्यक्ष 'स्वाब' संस्था.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!