नवभारत कन्या विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा
महाराष्ट्र दिनांचा कार्यक्रम मूल येथील नामांकित नवभारत कन्या विद्यालयात ध्वजारोहण करून संपन्न झाला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीतांचे सादरीकरण करण्यात आले. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यांच्या स्थापनेसाठी झालेला संघर्ष, झालेले हुतात्मे यांचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमास पर्यवेक्षक छत्रपती बारसागडे यांचेसह विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक, शिक्षीका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!