नागभीड येथे नॅशनल लेव्हल डान्स स्पर्धा...
नागभीड येथे नॅशनल लेव्हल डान्स स्पर्धा...
नागभीड:
नागभीड येथे बुधवार दिनांक 3 मे रोजी साय 7 वाजता तरंगिनी ग्रुप व श्रण्या डान्स अकॅडेमी नागभीड च्या वतीने आयोजित नॅशनल लेव्हल डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उदघाटन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया करणार आहेत.
सदर स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर प्रिन्स गुप्ता व प्रसिध्द डान्सर वैष्णवी पाटील उपस्थित राहणार आहेत... तर विशेष अतिथी म्हणून सिने अभिनेते आशिष पाथोडे उपस्थित राहणार आहेत तर या स्पर्धेचे सूत्रसंचालन अँकर परेश करणार आहे.
समूह नृत्य पहिले बक्षीस रुपये 51 हजार,द्वितीय 31 हजार,तृतीय 21 हजार,एकल पहिले फोक कलासिकल ग्रुप मध्ये पहिले बक्षीस 15 हजार,दुसरे बक्षीस 10 हजार,सोलो ग्रुप वेस्टर्न ग्रुप मध्ये पाहिले बक्षीस 15 हजार,दुसरे बक्षीस 10 हजार आहे... सदर स्पर्धेला उपस्थित राहण्याची विनंती आयोजक प्रियंका कोरे,प्रिया लांबट,आरती तहलानी यांनी केली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!