नॉन पेस्टिसाईड अग्रिकल्चर मॅनेजमेंट व पशुपालन याविषयी दोन दिवशीय प्रशिक्षण सम्पन्न
तळोधी (बा.);
समाज प्रगती सहयोग मेळघाट व रिवार्डस संस्था नागभीड यांच्या संयुक्त विद्यमाने नॉन पेस्टीसाईड आग्रिकल्चर/जैविक शेती व पशुपालन याविषयी ग्रामसभा प्रतिनिधींचे दोन दिवसीय प्रशिक्षण दिनांक 3 व 4 मे 2023 ला अवॉर्ड सभागृह नागभिड येथे सम्पन्न झाले.
या दोन दिवसीय प्रशिक्षणा मध्ये एकूण 50 ग्रामसभांना प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये कोरंबी, कसर्ला, रेंगातूर, धामणगाव चक, सारंगड, तीव्हरला, खडकी, हुमा, कानपा, बिकली, येनोली माल व नागभीड तालुक्यातील 22 गावातील ग्रामसभा पदाधिकारी व शेतकरी आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सरत कुमार रथ, प्रोग्राम ऑफिसर समाज प्रगती सहयोग मेळघाट, धर्मेंद्रजी गहलोत, समाज प्रगती सहयोग मेळघाट, गुणवन्त देवाजी वैद्य, संस्थापक रिवार्डस संस्था नागभीड, नीलकंठ लोनबले, सेवानिवृत्त प्रा. गोंडेदा, सौं लोणबले मॅडम, कैलास नन्नावरे, अध्यक्ष ग्रामसभा महासंघ नागभिड, पशुपालन व्यवसायिक अविनाश शेरकुरे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी जमिनीची सुपीकता कशी टिकवता येईल, जैविक शेतीमध्ये जमिनीची तयारी, बियाण्यांची पेरणी, तण नियंत्रण, पीक रोगावर प्रतिबंध, जैव खते, मित्र कीटक यांचे संरक्षण कसे करता येईल यावर सरतक कुमार रथ, धर्मेंद्रजी गहलोत, गुणवन्त वैद्य, यानी सविस्तर मार्गदर्शन केले याशिवाय जीवामृत कसे तयार करतात याबद्दल प्रात्यक्षिक करून दाखविले तर कुकूटपालन, शेळीपालन व लसीकरण याबद्दल कैलास नन्नावरे यानी मार्गदर्शन केले. तसेच दुग्धव्यवसाय यावर अविनाश शेरकुरे यानी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार श्री भोजराज नवघडे यानी केले तर हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौं. लीना शेंडे, सौं. सुनीता गाटे, कु. विशाखा बठे यानी अथक परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!