क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त बहुजनांचा संघर्ष, दिशा यावर मार्गदर्शन समाज प्रबोधन कार्यक्रम

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चिमूर, कौमी एकता नवजवान कमिटीतर्फे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने बहुजनांचा संघर्ष आणि दिशा या विषयांवर नेत्यांचे मार्गदर्शन आज गुरुवार दिनांक. १३/०४/२०२३ ला सायंकाळी ०५:०० वाजता नेहरू कनिष्ठ महाविद्यालय चिमुर च्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित राहतील. तर  उद्धघाटन माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या हस्ते होईल. स्वागताध्यक्ष युवा नेते दिवाकर निकुरे राहतील. याप्रसंगी प्रकाश देवतळे, गजानन बुटके, राजू हिंगणकर, प्रफुल्ल खापर्डे, खोजराम मरस्कोल्हे, विनोद बारेकर, जाहीद शेख, चुन्नीलाल कुडवे, उमेश हिंगे, सुरेश डांगे, राम चिचपाले, राजू रामटेके यांची उपस्थिती राहील. या कार्यक्रमानंतर लगेच मी वादळ वारा गायक अनिरुद्ध वनकर, येवू कशी कशी मी नांदायला फेम कोमल धांडे यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कौमी एकता नवजवान कमिटिचे अध्यक्ष जावाभाई शेख यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!