गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षेत एफ. ई. एस. गर्ल्स कॉलेजच्या विद्यार्थिनींचे मानसशास्त्र व संगीत विषयात सुवर्णपदक पटकावत घवघवीत यश


 

प्रतिनिधी:- कु. कुमुदिनी भोयर मूल

गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत सन 2021- 2022 मध्ये विविध परीक्षा घेण्यात आलेल्या विषय निहाय मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करण्यात एफ. ई. एस. गर्ल्स कॉलेज चंद्रपूरच्या कु. मयुरी तायवाडे मानसशास्त्र विषयात तर  कु. वैष्णवी मांडवकर संगीत विषयात विद्यार्थिनींनी धवधवीत यश प्राप्त केले आहे.  व विद्यापीठद्वारे देण्यात येणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक स्वर्गवासी गणपतराव मोगरे सुवर्णपदक मानकशास्त्र व स्वर्गवासी अंजनाबाई गणपतराव मोगरे संगीत सुवर्णपदकाच्या अनुक्रमे मानकरी ठरले आहेत.
 या विद्यार्थिनींच्या अभिनंदन फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूरचे अध्यक्ष मा. डॉ. विजय मोगरे सचिव, मा. ऍडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते तसेच संस्थेचे सर्व संचालक सदस्य व प्राचार्य मीनाक्षी ठोंबरे संगीत विभाग प्रमुख डॉ. प्रमोद रेवतकर, प्राध्यापक अशोक बनसोड मानसशास्त्र विभाग प्राध्यापक योगेश निमगडे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक रुंद यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!