नवभारत कन्या विद्यालयात डॉ. आंबेडकर जयंती साजरी



विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम मूल येथील नामांकित नवभारत कन्या विद्यालय येथे संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती अलका राजमलवार होत्या यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक छत्रपती बारसागडे यांचे सह ज्येष्ठ शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका श्रीमती राजमलवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मेणबत्ती प्रज्वलित केली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे मनोगत श्रीमती राजमलवार, श्री. बारसागडे सर व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन दिनेश जिड्डीवार यांनी तर आभार प्रदर्शन धीरज नौकरकर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!