मुल येथे गुरु- शिष्य स्मरण लोकजागृती सोहळ्याचे आयोजन
मूल प्रतिनिधी
सामाजिक क्रांतीचे अग्रदूत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने ओबीसी विचारमंच मुलच्या वतीने कर्मवीर मा .सा. कन्नमवार सभागृहात १४ एप्रिल २०२३ रोजी ओबीसी लोकजागृती कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संघटक सूर्यकांत खनके तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे संस्थापक बळीराज धोटे ,फुले शाहू आंबेडकर विचार प्रवर्तक डॉ. अभिलाषा गावतुरे , सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अलकाताई ठाकरे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे .
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून रामभाऊजी महाडोळे सामाजिक कार्यकर्ता , रमेशजी मानकर सरचिटणीस भारतीय बौद्ध महासंघ चंद्रपूर जिल्हा , माननीय नथ्थूजी पाटील आरेकर सामाजिक कार्यकर्ता , सुनीलराव बल्लमवार माजी प्राचार्य , संजयजी पडोळे जिल्हाध्यक्ष वाईस ऑफ इंडिया चंद्रपूर , अशोकराव येरमे तालुका अध्यक्ष भारतीय आदिवासी समाज , हिरालाल भडके संयोजक विषमता निर्मूलन दल व रत्नमालाताई गेडाम सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित राहणार आहे . तरी तालुक्यातील सर्व युवक- युवती ,बंधू -भगिनींनी या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे , असे ओबीसी विचारमंच मूलच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!