वादळी पावसामुळे अनेक घरांचे नुकसान - चांदली बूज. येथील नुकसानग्रस्तांची मदतीची मागणी


वादळी पावसामुळे अनेक घरांचे नुकसान  - चांदली बूज. येथील नुकसानग्रस्तांची मदतीची
मागणी 
सावली - सद्या राज्यात अवकाळी वादळी पाऊस सुरु असून याचा फटका सावली तालुक्यातील चांदली बूज. येथील घरांना बसलेला आहे. शासनाने पंचनामा करून भरपाई मदत  देण्याची मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.


     चांदली बूज. येथे दिनांक 23 एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. या वादळात कुणाचे तीनपत्रे, कवेलू उडाले तर कुणाचे भिंती कोसळल्या. याबाबत चौकशी करून येथील सरपंच विठ्ठल येगावार, पोलीस पाटील चिंतामण बालमवार यांनी प्रशासनाकडे माहीती दिली आहे. या नुकसानग्रस्तांमध्ये संदीप मोहुर्ले, मारोती रामेवार, रंजन गुरनुले,  श्रीरंग गुरनुले, लीलाबाई एडनूतलवार, देवाजी कोसरे, पुणेश मुठावार, लचमा कन्नावार, शंकर तोडेवार, ताराबाई कोमावार, बंडू मोहुर्ले व इतरांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!