विधान परिषदेत शिक्षकांचा आवाज बुलंद करणारे खणखर आमदार सुधाकर अडबाले - आमदार वडेट्टीवार यांचे सत्कार प्रसंगी मत
विधान परिषदेत शिक्षकांचा आवाज बुलंद करणारे खणखर आमदार सुधाकर अडबाले - आमदार वडेट्टीवार यांचे सत्कार प्रसंगी मत
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली तर्फे आमदार अडबाले यांचा सत्कार
सावली(प्रतिनिधी)
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीच्या विद्यमाने नवनिर्वाचित नागपूर शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री.सुधाकर अडबाले व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे सिनेट सदस्य डॉ. विवेक शिंदे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी आमदार विजय वडेट्टीवार यांनी आमदार सुधाकर अडबाले यांच्या कार्याचा गौरव केला व आता देशाला वाचविण्यासाठी शिक्षकांनी पुढे यावे असे आवाहनही केले.
कार्यक्रमाचे उदघाट्न राज्याचे माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. समारंभाचे अध्यक्ष भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व जिह्वा मध्यवर्ती बँकेचे संचालक संदीप गड्डमवार होते . यावेळी माजी आमदार नामदेवराव उसेंडी, माजी आमदार देवराव भांडेकर, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल शिंदे, चंद्रपूर सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष सूर्यकांत खनके,भारत शिक्षण मंडळाचे सचिव राजाबाळ पा.सांगिडवार, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार, प्रशांत गाडेवार, मुन्ना स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार सुधाकरजी अडबाले यांनी " आमदार वडेट्टीवार यांनी माझ्या उमेदवारीसाठी फार रिस्क घेतली. सर्व शिक्षक बंधू व महाविकास आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे मी आज आमदार, शिक्षकांचा आवाज विधानपरिषदेत उंचावणार,त्यांच्या हक्कासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहील" असे प्रतिपादन त्यांनी केले. तर " सुधाकरजी अडबाले विधान परिषदेत शिक्षकांचा आवाज बुलंद करणारे खणखर व प्रयत्नशील आमदार, महाविकास आघाडीला त्यांचा सारखा उच्च विचारांचा व सदैव प्रयत्नशील आमदार भेटणे हे सौभाग्यच" असे प्रतिपादन विजय वडेट्टीवार, माजी मंत्री व विद्यमान आमदार यांनी सत्कार समारंभा प्रसंगी केले. यावेळी भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्याबद्दल संदीप गडमवार यांचाही सत्कार करण्यात आला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!