ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खडसंगी वनपरिक्षेत्रातील भुयार देव परिसरात वाघीणीला जेरबंद करण्याचे वन विभागाचे प्रयत्न...
जेरबंद करण्याचे कारण मात्र गुलदस्त्यात.....
वरोरा.... जगदीश पेंदाम
ताडोबा व्याघ्र प्रकल्प जगामध्ये प्रसिद्ध असून ताडोबातील वाघाने देश-विदेशातील अनेकांना वेळ लावले आहे त्यामुळे कोणी ना कोणी मोठे सेलिब्रिटी ताडोबामध्ये वाघ पाहण्यासाठी येत असतात परंतु वनपरिक्षेत्र खडसंगी बप्पर क्षेत्रात येत असलेल्या (भुयार देव ) नवेगाव गेट परिसरातील झरणी वाघणीचा असलेल्या पिल्याला मागील दहा ते बारा दिवसापासून खडसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर ) यांच्या मार्गदर्शनाखाली, इतर वन कर्मचारी तपास (मागवा ) घेऊन पकडून जेरबंद करण्याच्या प्रयत्न करीत आहे....
परंतु वाघिणीचा( बच्चा) हा जवळपास दोन वर्षाच्या असून त्या वाघिणीला कुठल्याही पद्धतीची दुखापत किंवा परिसरातील कुठल्याही मनुष्याची जीवितहानी केली नसूनसुद्धा त्या वाघिणीला का पकडत आहे हे मात्र सध्या तरी गुलदस्ता मध्ये लपलेले आहे...
अनेक पर्यटकाला त्या वाघीणीने नवेगाव पर्यटन गेटवरून दर्शन देत पर्यटकांचा आनंद द्विगुणीत केलेला असून अनेक पर्यटक नवेगाव गेटवरून सफारीचा आनंद घेत असतात त्यामुळे त्या वाघिणीला वन विभाग कोणत्या कारणास्तव पकडत आहे असा प्रश्न गावकरी, व पर्यावरण प्रेमी मध्ये यांच्या मनात निर्माण झालेला आहे........



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!