तळोधी येथे करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न
तळोधी (बा.)
महात्मा फुले विद्यार्थी व विद्या|र्थिनी संघटना तळोधी (बा.) तर्फे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळेस Bank, UPSC, MPSC, MBA, या परीक्षाबद्दल विद्यार्थ्यांना मा. श्री स्वप्निल तुळसकर सर, नागपूर ( Founder of Hub of compitative community classes) योग्य असे मार्गदर्शन केले तसेच इतर व्यवसायिक करिअरबद्दल मा. प्रा. नामदेवराव जेंगठे सर ( अध्यक्ष माळी महासंघ चंद्रपूर) यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री बबनराव गुरनुले सर सेवानिवृत्त शिक्षक महात्मा फुले विद्यालय तळोधी (बा.) तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री अशोकजी शेंडे सर हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा फुल , क्रांतिज्योती सावित्रीआई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज तसेच सावता माळी यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करण्यात आले व मशाल पेटवून करण्यात आली. प्रमुख पाहूण्यांचे स्वागत हे स्वागत गिताने करण्यात आले तसेच पाहूण्यांना शिल्ड, शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. जया महाडोळे व गणेश गुरनुले यांनी केले व आभार प्रदर्शन कु. भूषण गुरनुले यांनी केले.
कार्यक्रमाला परिसरातील विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नाना मार्गदर्शक व्यक्तीनी योग्य ते उत्तर देऊन त्यांचं समाधान केलं अशाप्रकारचा कार्यक्रम तळोधी (बा.) या परिसरात प्रथमतः झालं त्यामुळे सगळीकडे या कार्यक्रमाची चर्चा होत आहे. अशाप्रकारचे कार्यक्रम झाल्यास मूलांना आपल्या करिअर बद्दल योग्य मार्ग निवडता येईल असा लोकांच्या मनात विश्वास निर्माण झालाआहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!