दिव्य वंदना फाउंडेशन ला नगरपरिषदेचा आधार



निराश्रीत बेवारस भिक्षेकरी रस्त्यावरील निराधार जिवांना मायेचा आधार देत त्यांच्यासाठी माणुसकीचे कार्य करणाऱ्या दिव्य वंदना आधार फाउंडेशन ला मुल नगरपरिषदेने सहकार्य करीत कपडा बँकेतील जमा झालेले कपडे देत सामाजिक कार्याला चालना दिली आहे.
दिव्यवंदना आधार फाऊडेशन द्वारा संचालित रोडवरील बेघर, बेवारस, भिक्षेकरी, निराधार, अनाथ केंद्र व वृध्दश्रम लोकांशी आपुलकीने जपत आधार देणे, उपचार करणे, परिवार मिलन करणे, रोजगार उपलब्ध करणे कार्य अती उत्साहाने व प्रामाणिक पणे पार पाडीत आहे या कार्याला नगर परिषद मुल चे अधिनिस्त असलेले कपडा बँक मधून जमा झालेले कपडे आज दिव्य वंदना आधार फाउंडेशन ला देण्यात आले. मूल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक अभय चेपूूूूूूरवार यांचे सह नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!