भाजपचे खंदेसमर्थक देविदास जांभुळे यांनी महाविकास आघाडी परिवर्तन पॅनलला दिले समर्थन

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - सध्या चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मोठ्या उत्साहाने सुरू असून राजकिय क्षेत्रात नेत्यांची दिवसा व रात्रीची मतदारांच्या भेटी घेत झोप उडाली आहे. अशात राजकिय डावपेच मोठ्या प्रमाणात काँग्रेस तथा भाजप या दोन्ही राजकिय पक्षा मध्ये युतीचे समीकरण अशी अफवा वाऱ्यासारखी पसरविण्यात आली होती. तर भाजप च्या शेतकरी सहकार विकास आघाडी च्या उमेदवारांनी चक्क काँग्रेस च्या पदाधिकारी यांना न विचारता त्यांची बॅलट पेपरवर नावे कोरल्या गेली हा कसला प्रकार आहे युती नसतांना पक्षा - पक्षात भांडण लावणे अशी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून मतदात्यांमध्ये चर्चा सत्र सुरू झाले आहे. अंतिम टप्प्यात निवडणूक आली असून भाजपचे खंदेसमर्थक देविदास रामदासजी जांभुळे यांनी महाविकास आघाडी परिवर्तन पॅनलला खुले समर्थन दिले आहे.या आधी भाजप चे माजी पंचायत समिती सदस्य पुंडलिक चिंधुजी मत्ते यांनी महाविकास आघाडी परिवर्तन पॅनलला समर्थन देऊन पॅनलमध्ये प्रवेश करून उमेदवारी दाखल केली त्यामुळे महाविकास आघाडी परिवर्तन पॅनलची ताकत द्विगुणित झाली असून तालुक्यात ठिक - ठिकाणी याबाबत ची चर्चा रंगली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!