तळोधी बा. पोलीस स्टेशन ला नवीन थानेदार भोयर रुजू, तर शेंडे यांना निरोप.
तळोधी बा:
येथील पोलीस स्टेशन ठाणेदार निलकंठ शेंडे यांची बदलीसाठी विनंती अर्ज दाखल असल्याने त्यांची तडकाफडकी चंद्रपूर येथे बदली झाली असून त्यांच्या जागी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर यांनी तळोधी बा. पोलीस स्टेशन मध्ये रुजू होऊन कार्यभार सांभाळला आहे. तळोधी बा. पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावातील कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तरुण ठाणेदार ची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस स्टेशन जरी लहान असला तरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जवळपास ४२ गावांमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याची, व त्यातही सध्या पोलीस स्टेशन ला उपस्थित असलेल्या कमी पोलीस कर्मचार्यांचा तुटवडा, अवैध दारू व अवैध रेती तस्करी करणाऱ्या तस्कराकडून नवीन ठाणेदार यांना आव्हान असून तस्करी करणारे मुसक्या आवळणार का. असे नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले आहे.
यावेळी तळोधी बा. पोलीस स्टेशन, व ग्रामीण पत्रकार संघ तळोधी (बा.) च्या वतीने नवीन ठाणेदार मंगेश भोयर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व त्यांना समोरच्या कार्याकरीता शुभेच्छा दिल्या. व ठाणेदार निलकंठ शेंडे साहेबांना पुष्प गुच्छ देऊन व समोरील वाटचाली करीता शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!