चांदापूर हेटी येथे शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न
प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल
आज दिनांक 28 एप्रिल 2023 रोज शुक्रवार ला जि . प . प्राथ.शाळा चांदापूर हेटी येथे सकाळी 8:30 वाजता भरतीपात्र विद्यार्थ्यांसाठी शाळापूर्व तयारी मेळावा पहिल्याचे आयोजन करण्यात आले . सकाळी 8:00 वाजता लेझीम प्रथक व डफरी द्वारे विध्यार्थ्याची मिरवणूक काढण्यात आली . मिरवणूकीत चांदापूरच्या सरपंच सन्मा.सौ . सोनीताई कालीदास देशमुख, सन्मा. श्री . अन्नाजी पा . ठाकुर अध्यक्ष शा व्य स चांदापूर हेटी व सर्व शाळा व्य. समिती सदस्य . पालक व युवक सहभागी झाले . मिरवणूक सर्व भरतीपात्र विघ्यार्थ्यांच्या घरी नेण्यात आली व भरतीपात्र विध्यार्थ्याना टोपी व फुगे देऊन स्वागत करण्यात आले व मिरवणूकीत सामील करून घेतलं . त्यानंतर ठिक 8:30 वाजता सन्मा. सरपंच मॅडम यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व फित कापून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले . त्यानंतर सातही स्टॉलची माहिती देण्यात आली . व भरतीपात्र विध्यार्थ्यांची विकासपत्र व स्टॉल नुसार चाचणी घेण्यात आली व विध्यार्थ्याकडून कृती करून घेण्यात आली . यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे पालकांनी सुद्धा चांगले सहकार्य केले . अपंग समावेशित तालुका तज्ज्ञ सन्मा. विवेक डांगे सर उपस्थित होते . त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते . मेळाव्यामध्ये तरुणांनी सहकार्य केले . त्यानंतर नास्ता देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!