ऑनलाईन करण्यासाठी रात्रभर शेतकरी सोसायटी मध्ये .
तळोधी बा.---
नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील आदिवासी सेवा सहकारी सोसायटीमध्ये उन्हाळी धान्याची फसल घेणारे शेतकरी रात्रभर सोसायटीमध्ये रात्र जागून काढत असून शासन व स्थानिक संस्थेच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्याना मनस्ताप सोसावा लागत असल्याचा आरोप शेतकऱ्याकडून होत आहे.
नागभिड तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमानात धानाची लागवड करतात . त्यात सावरगाव परिसर अग्रेसर आहे .आधीच शेतकरी शेती करताना तारेवरची कसरत करावी लागत असते शेतात उत्पादन होऊनही शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे "पिकला तर विकत नाही, व विकला तर भाव नाही , आणि भाव नाही तर शेतकर्यांच्या गतीला पारावार नाही " म्हणजेच शेतकऱ्यांचा वाली कोणी नाही फक्त निवडणूक असली की सर्वच विविध अस्वासने देऊन वेळ मारून नेतात व याच्यातच "बळी तो कान पिळी " अशी परिस्थीती शेतकऱ्यांची होऊन जाते .
आदिवासी सेवा सहकारी संस्था सावरगाव येथे कार्यरत आहे या सोसायटी अंतर्गत जवळपास चार गाव येत असून त्यात सावरगाव ,चिखलगाव ,वलनी मेंढा, चारगाव , या सर्वच गावामध्ये शेतकऱ्यांनी शासनावर अवलंबून न राहता स्वतः शेतात लाखो रुपये खर्च करून बोरवेलची सोय करून घेतली व आपल्या शेतात उत्पन्न वाढवून आपली आर्थिक परिस्थिती कशी वाढेल यासाठी प्रयत्नरत आहेत. परंतु शासनाच्या व संस्थेच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सोसावा लागत आहे . नागभीड तालुक्यातील इतर सोसायटीचे सर्वच सातबारा ऑनलाईन पूर्ण झाले परंतु सावरगाव या सोसायटीचे सातबारे त्यांचे चुकीचे धोरणामुळे ऑनलाईन होऊ शकले नाही आणि याचा त्रास शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे . दी.२४..एप्रिल रोजी गावागावात दवंडी देण्यात आली व त्या रात्रीपासून शेतकरी ऑनलाईन करण्यासाठी संस्थेत रात्र जागून रांगेत लागून आहेत . .
*शेतकऱ्यांचा त्रास वाचविण्यासाठी आदिवासी सेवा सहकारी संस्थेने यापूर्वीच जर सातबारे गोळा करून ऑनलाईन केले असते तर एवढा त्रास शेतकऱ्यांना झाला नसता यासाठी येतील प्रशासन जबाबदार व यांचा भोगळ कारभार आहे .
दिवाकर ऋषिजी ठीकरे शेतकरी सावरगाव *
*ऑनलाईन करण्यासाठी लाईनमध्ये लागण्याची व रात्रभर जागण्याची काही एक गरज नाही शेतकऱ्यांनी दिवसभरात सातबारा जमा करून ऑनलाईन करून घेतली तरी होत असते .
मा. प्रेमदास सडमाके व्यवस्थापक
सेवा सहकारी संस्था सावरगाव *



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!