अनावश्यक खर्चाला फाटा देत वृद्धाश्रमात वृध्दांसोबत | साजरा केला वाढदिवस - मुख्याध्यापक सतीश डांगरे यांचा स्तुत्य - अभिनव उपक्रम
अनावश्यक खर्चाला फाटा देत वृद्धाश्रमात वृध्दांसोबत | साजरा केला वाढदिवस - मुख्याध्यापक सतीश डांगरे यांचा स्तुत्य - अभिनव उपक्रम
1. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडधा (तु.) प. स. वरोरा शाळेचे मुख्याध्यापक सतीश वसंतराव डांगरे यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत वरोरा येथील अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रम - अनाथाश्रम मध्ये सर्वासोबत वाढदिवस साजरा करीत समाजात एक आदर्श निर्माण केला.
आपला वाढदिवस आला की, आपल्या समोर येतात आपले मित्र, मित्रांसोबत महागडी हॉटेल मध्ये पार्टी, या पाश्यात्य संस्कृतीमुळे तरुण पिढी भारतीय संस्कृती विसरत चालले असून यामुळे समाजात 'संस्कृतीमुळे दुष्परिणाम होताना दिसत आहेत. याच पाश्चात्य संस्कृतीला फाटा देत वरिष्ठ मार्गदर्शकांचे उपस्थितीत त्यांच्या आशीर्वादरूपी शुभेच्छाने अनावश्यक खर्चाला फाटा देत वरोरा तालुक्यातील वडधा (तु.) येथील शाळेचे मुख्याध्यापक सतीश डांगरे यांनी आपला ५० वा वाढदिवस सोहळा अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रम - अनाथाश्रम वरोरा येथे संपन्न करून आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी विचार प्रदान केला. या वाढदिवस कार्यक्रमाला अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरीचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, शिक्षण विस्तार अधिकारी प.स. वरोरा- नामदेवराव राउत, अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरीचे आजीवन प्रचारक तथा चंद्रपूर जिल्हा प्रचार प्रमुख रूपलाल कावळे, अहिल्याबाई होळकर वृध्दाश्रम व अनाथाश्रम च्या संचालिका सौ. सोनुबाई अशोक येवले संचालक -अशोकराव येवले, तालुक्यातील शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, विविध संस्थेचे, गटाचे पदाधिकारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आप्त व मित्र परिवार यांची उपस्थिती होती.
सोहळ्याची सुरुवात वाढदिवसाचा केक -सतीश डांगरे, अर्धांगिनी मंगला डांगरे मुलगा क्रांतदर्शी डांगरे व मान्यवरांचे हस्ते केक कापून करण्यात आला. सदर कार्यक्रमात डांगरे परिवारातर्फे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रम - अनाथाश्रम चे संचालिका सोनूबाई व अशोक येवले यांचा त्यांच्या कर्तृत्वाच्या गौरवार्थ शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुख्याध्यापक सतीश डांगरे यांच्या आदर्शवादी कार्याला शुभेच्छा देत त्यांच्या कार्यात नेहमी सहभागी राहू, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कार्य घराघरामधे जनमाणसात पोहचवून सहकार्य करते. असे आवाहन मान्यवरांनी केले.
वाढदिवसानिमित्त डांगरे परिवाराकडून वृद्धाश्रमातील आश्रीतांच्या त्यांच्या इच्छेनुसार स्नेहभोजन, खाऊवाटप, गहू अनाज दान दिले. त्याबद्दल अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रमाच्या संचालिका सोनूबाई येवले यांनी परिवाराचे आभार मानून अशाप्रकारे सतिश डांगरे सरांच्या सत्कार्याच्या प्रेरणेतून असाच आदर्श समाजांनी ठेवावा असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 'राजेंद्र पांडे सर निमसडा व आभार प्रदर्शन धीरज लाकडे, अध्यक्ष, शेषरत्न बहुउदेदशीय संस्था, वरोरा यांनी केले



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!