नेरी शहर अध्यक्षपदी राहुल पिसे यांची नियुक्ती

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष रोशन भाऊ ढोक यांनी चिमूर तालुका युवक कांग्रेस कमिटीच्या नेरी शहर अध्यक्ष पदावर राहुल मनोहर पिसे यांची नियुक्ती केली.आपण कांग्रेस पक्षाची प्रतिमा जनमाणसात उज्वल करण्यासाठी प्रयत्नशील राहावे कांग्रेस पक्षाचे ध्येयधोरणे समाजातील संपूर्ण जणमाणसा पर्यंत पोहचवाल आपण अनेक वर्षा पासून राजकीय क्षेत्रात काम करत आहात, आपले, संघटन, समाज कार्य करण्याची वृत्ती, लक्षात घेऊन आपली या पदावर नियुक्ती करण्यात आली नियुक्ती पत्र देतांना डॉ.अविनाश वारजूकर माजी आमदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ७४ चिमूर  विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर डॉ.सतिशभाऊ वारजूकर, चिमूर  विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोशन ढोक, काँग्रेस कार्यकर्ते नेरी शिरपूर जि. प. सर्कल प्रमुख विलास पिसे, गोकुल पिसे,श्रीकांत कांमडी , मंथन मेहरकुरे, सागर पिसे, कुणाल पंधरे तुषार वाघे,विकी फटींग, आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!