खेडी येथे खंडोबा बिरोबा महोत्सवाचे आयोजन - कुरमार धनगर समाजाचा पुढाकार
खेडी येथे खंडोबा बिरोबा (आब्बा) महोत्सवाचे आयोजन - कुरमार धनगर समाजाचा पुढाकार
खेडी येथे खंडोबा बिरोबा महोत्सवाचे आयोजन - कुरमार धनगर समाजाचा पुढाकार
सावली - खेडी येथे कुरमार धनगर समाजाचे वतीने 22 मार्च ते 29 मार्च पर्यंत खंडोबा बिरोबा महोत्सवाचे (आब्बा) आयोजन करण्यात आलेले आहे. या महोत्सवाकरिता तेलंगाना राज्यातील भाट पारंपारिक वेशभूषेत, ढोल ताशाच्या गजरात विधी साजरी करतात. गावातील सर्व आराध्य दैवतांची पूजा होते. यावेळी गावातील मेंढपाळ जे वर्षभर बाहेर असतात ते सर्व शेळ्या मेंढ्यासह उपस्थित होतात. समाजातील इतर गावातील नातेवाईक महोत्सवात सहभागी होतात. आराध्य देवतांवर आधारीत तेलगू भाषेत कथा गायली जातात. हा उत्सव खेडी येथे 20 वर्षांनंतर होत असल्याने गावामध्ये उत्साहाचे वातावरण आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!