ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नवेगाव बफर गेट येथे वाचणालयाचे उदघाटन
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - देश विदेशातील पर्यटक व्याघ्र दर्शनासाठी ताडोबा मध्ये व्याघ्र सफारी करीता मोठ्या संख्येने येत असतात पर्यटकांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नवेगाव बफर गेट येथे नेहमीच व्याघ्र दर्शन होत असते म्हणून या गेटवर नेहमीच पर्यटक यांची गर्दी पहायला मिळत असते. म्हणून या नवेगाव गेटवर पर्यटक तसेच गाईड ला वन्य प्राण्यांबद्दलची संपूर्ण माहिती प्राप्त व्हावी याकरिता गुढी पाडवा मराठी नवीन वर्षाचे औचित्य साधून परिक्षेत्र वन अधिकारी (आर.एफ.ओ) किरण धानकुटे यांच्या मार्गदर्शनात आर.ओ. मेंडूलकर यांचे हस्ते वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी गेट मॅनेजर राहुल कोयचाडे, सूरज नन्नावरे, निसर्ग मार्गदर्शक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!