चिमूर तालुक्यात अवैध रेती व मुरूम उत्खनन तहसीलदार बुरांडे यांच्या आशिर्वादाने सुरु - डॉ. सतीश वारजूकर

कांपा शंकरपूर भिसी मार्गे दररोज अवैध रेतीने भरलेली शेकडो हायवा ट्रक सर्रास खुलेआम बिनधास्तपणे होत असते वाहतूक

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्त्यांची अवैध रेती तसेच मुरूम वाहतूकिचे व्यवसाय जोमाने सुरु असून तलाठ्यांनी रेतीची हयावा ट्रक तसेच ट्रॅक्टर पकडले असता तहसीलदार बुरांडे स्वतःच तलाठ्यांना फोन करून ट्रॅक्टर ट्रक सोडून देण्यास सांगत असते म्हणून अवैध रेती तसेच मुरूमाची तस्करी व वाहतूक महसूल अधिकारी यांच्या उघड्या डोळ्या समोरून खुलेआम होत आहे. अशातच कांपा, शंकरपूर, भिसी मार्गे दररोज अवैधरित्या शेकडो हायवा ट्रक रेतीने भरलेली वाहतूक होत असून या वाहतुकीस तहसीलदार बुरांडे व पोलीस प्रशासनाचे मोठे सहकार्य असल्याचे कळते मागील  फेब्रुवारी महिन्यामध्ये १५ ते २० हायवा ट्रक शंकरपूर वासीय गावाकऱ्यांनी पकडून दिली होती. परंतु महसूल प्रशासन यांचे नाकर्ते पणामुळे आणि घटनास्थळी येण्यास उशीर केल्याने काही हायवा ट्रक पसार झाले यातील ६ हायवा ट्रक सापडले परंतु पोलीस आणि उपविभागीय अधिकारी संकपाळ यांच्या डोळ्यासमोरून चिमूर तहसीलला हयावा जप्तीची कारवाई करीत असतांना खरकाडा जवळून १ हायवा पसार झाल्याची घटना घडली व त्या हायवा ट्रक ला अजूनपर्यंत पोलीस पकडण्यास असमर्थ ठरली असून तहसीलदार बुरांडे यांच्या कारकिर्दीत भाजप पक्षाच्या कार्यकर्ते यांची अवैध रित्या रेतीने भरलेली ट्रॅक्टर पकडली असता तलाठीयांना धमकावून २ ट्रॅक्टर पळवून नेल्याची  घटना घडली आहे.परंतु  अजूनही पोलीस व तहसीलदार यांनी या ट्रॅक्टर ला पकडले नाही. व ते ट्रॅक्टर आजही रेतीची खुलेआम तस्करी करीत आहे.अशा भ्रष्ट तहसीलदार बुरांडे यांची कायदेशीर चौकशी करून गैर मार्गाने सुरु असलेल्या या रेती व्यवसायावर आढा घालून त्यांना निलंबित करण्यात यावे.असे आरोप डॉ. सतीश वारजूकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक यांनी केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!