दिवाकर निकुरे यांच्या चंद्रपूर जिल्हा ग्रामीण ओबीसी अध्यक्ष पदाचा होत आहे काँग्रेस पक्षातच विरोध
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिवाकर निकुरे यांना दिनांक.१४ मार्च २०२३ ला मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे भानुदास एस माळी प्रदेशाध्यक्ष ओ.बी.सी. विभाग यांनी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण ओ.बी.सी. अध्यक्ष पद हे नानाभाऊ पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या शिफारशीने देण्यात आले. परंतु विविध ठिकाणी या पदाचा स्वागत होत आहे. तर स्वतःच्या काँग्रेस पक्षातच विरोध होत आहे असे दिसून येत आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात जाऊन काँग्रेस पक्षाच्याच पदाधिकारी यांनी या पदाचा विरोध दर्शविणे हे योग्य नसून याबाबत विविध स्तरावर चिमूर विधानसभा क्षेत्रात चर्चा रंगली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!