मूल पोलीस स्टेशनमध्ये महिला दक्षता समितीची बैठक संपन्न
मूल (प्रतिनिधी)
मूल पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुमित परतेकी यांचे अध्यक्षतेखाली आज महिला दक्षता समितीची बैठक संपन्न झाली.
या सभेत महिलांवरील व मुलांवरील होत असलेल्या गुन्ह्याबाबत चर्चा करण्यात आली. गुड टच बॅड टच ची माहिती देण्यात आली. तालुक्यातील कुठेही महिला आणि मुलींवर अत्याचार झाल्यास, ही माहिती तातडीने देण्याचे आवाहन ठाणेदार परतेकी यांनी यावेळी उपस्थित दक्षता समितीच्या महिला सदस्यांना केली. यावेळी महिला दक्षता समितीच्या महिला उपस्थित होत्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!