बौद्ध समाज बांधवावर लावलेले फौजदारी गुन्हे तात्काळ मागे घ्यावे.


( सावरगाव च्या उपसरपंचावर गुन्हा दाखल करून पदावरून पाय उतार करण्याची  मागणी,  व
पोलिसांच्याच दिरंगाईमुळे  बौध्द समाजाचे व महानुभव पंथाच्या लोकांत हाणामारी होउन झाला दंगा झाल्याचा  पत्रकार परिषदेत आरोप.)

तळोधी बा: 
     
         नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे सोमवार च्या रात्री   बौद्ध समाज बांधव यांच्या ग्रामपंचायत नमुना ८ नुसार अ. नु. क्र. १०३२ व मालमत्ता क्र. ९४४ नुसार बौद्ध समाज बांधवाचे आर. सी. सी. सभागृहच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेवरती महानुभाव पंथाच्या लोकांनी  नियम बाह्य व बेकायदेशीर रित्या खोदकाम करून त्या जागेवर कुष्णाची मुर्ती ची स्थापना करण्याचा प्रयत्न करून ,  खुल्या जागेवर बांधकाम करण्यास विरोध करण्यासाठी गेलेल्या बौद्ध समाज  बांधवांना मारहाण करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करुन तसेच सावरगाव ग्राम पंचायत च्या उपसरपंच प्रविण खोब्रागडे यांनी महानुभाव पंथाच्या लोकांना समोर करुन बांधकाम करण्याची केलेली बळजबरी ला उपसरपंच जबाबदार असून त्याच्या फौजदारी गुन्हा दाखल करून पाय उतार करण्याची मागणी सावरगाव येथील घेतलेल्या पत्रकार परिषदेत बौद्ध समाजाचे अध्यक्ष डोमा रामटेके व बौद्ध समाज चे इतर पदाधिकारी यांनी केली आहे. 
            बौद्ध समाजाच्या पुर्वी पासून असलेल्या सभागृहाच्या बाजूला खुली जागा आहे. याठिकाणी बौद्ध समाज बांधव अनेक वर्षांपासून वर्षभर विविध  सामाजिक कार्यक्रम करीत होते. त्या ठिकाणी १४ एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, १४आक्टोबर धम्म चक्र परिवर्तन दिन, २६नोव्हेबर संविधान दिन, अशा सर्व महापुरुष ची जयंती बौद्ध समाजाच्या वतीने त्याठिकाणी केली जात होती.   मात्र तरीही बौद्ध समाज बांधवाच्या वापरात असलेल्या खुल्या जागेवर महानुभाव पंथाच्या लोकांनी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता व ग्राम पंचायत ने बांधकामाला परवानगी नाकारली अस्तांना ही बळजबरीने रात्री ला नियम बाह्य काम करुन कृष्ण मुर्ती ची स्थापना करून दोन समाजामध्ये भांडणे व हाणामारी निर्माण करुन सामाजिक दंगा निर्माण केला आहे.
          सावरगाव चे उपसरपंच प्रविण खोब्रागडे यांनी महानुभाव पंथाच्या लोकांना एकत्र करीत जमाव करून त्या ठिकाणी रात्री ला  बळजबरीने अवैध बांधकाम करण्यास  उकासाविले. तसेच बौद्ध समाज च्या वतीने विरोध केला असता दगड, विटा, काट्याच्या साहाय्याने हल्ला केला.    त्यात बौद्ध समाजाचे सोनु दामोदर रामटेके वय ४९ व आशा सोनु रामटेके, वैजता हिवराज शेन्डे,मंदाताई जयराम रामटेके याना दगड विटा मारुन गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत त्याना नागभीड वरून चंद्रपूर ला रेफर करण्यात आले .
          दुपरलाच खाली जागेवरच खोदकाम सुरू केले असताना ग्राम पंचायत ने बांधकाम थांबविण्याचा नोटीस दिला माञ सायंकाळी परत बांधकाम सुरू करण्याची सुरुवात झाल्यामुळे बौद्ध समाज बांधवानी  तळोधी बा. पोलीस ठाण्यात बेकायदेशीर बांधकाम होत असल्याचे कळवून मदत मागितली असताना आम्हाला सायंकाळी ७ ते १० वाजे पर्यंत दोन ते तीन तास ठाण्यात ताटकळत ठेवले. व विरोधी गटाने याच कालावधीत  आमचा पंचशील झेंडा मोडून त्या ठिकाणी मूर्ती मांडून बांधकाम सुरू केला, या बाबत आम्हाला माहिती मिळताच पोलिसांनी आम्हाला मोक्याच्या ठिकाणी पाठवून स्वतः उशिरा आले.
आम्ही बांधकामाला विरोध केला तेंव्हा आमची संख्या कमी असल्यामुळे महानुभव पंथाची लोकांनी आम्हाला जबर मारहाण केली. माञ त्या नंतर ही आम्हाला गंभीर मार लागून ही, तडजोडी करीता आम्हावरही गुन्हा दाखल केला गेला. ते दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे, यात पोलीसांची भुमिका ही संशयास्पद असल्याचे आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.     
              सावरगाव ग्रामपंचायत चे उपसरपंच हे जबाबदार व्यक्ती असून त्यानी महानुभाव पंथाच्या लोकांना एकत्र करून बौद्ध समाज बाधंवावर हल्ला करून मारहाण केली. व दोन समाज बाधंवामध्ये अशांतता निर्माण केली.तसेच पंचशील ध्वज व तोरणा ची मोड तोड करून बौद्ध समाज चा अपमान केला.  त्यामुळे महानुभाव पंथाच्या लोकांवर फौजदारी गुन्हा नोंद करून आम्हाला आमची खुली जागा मोकळी करून दयावी.   व बौद्ध समाजाला न्याय द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेला बौद्ध समाज सावरगाव चे अध्यक्ष डोमा रामटेके, सोनू रामटेके, बबन लोणारे, केवळराम लोणारे, हरिश्चंद्र लोणारे,हितेश लोणारे,सौ. सविता के. लोणारे,  सौ. प्रतिमा नागेश्वर सोनटक्के, सौ. लिना विलास रामटेके, सौ. आशा रामटेके, सौ. मंदा रामटेके व समाज बांधव मोठ्या संख्येने पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!