भाजपा तळोधी च्या वतीने तळोधी बंद व भव्य मूक मोर्चा संपन्न.
तळोधी (बा.);
चिमूर विधानसभेचे आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ ) भांगडिया त्यांचेवर चिमूर पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी आपला निषेध दर्शविण्यासाठी भारतीय जनता पार्टी शाखा तळोधी तालुका नागभीड च्या वतीने आज *तळोधी बंद आणि भव्य मूक मोर्चाचे* आयोजन तालुकाध्यक्ष संतोष भाऊ रडके यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
पुकारण्यात आलेल्या बंद ला तळोधी येथील छोटे मोठे व्यापारी यांनी आपआपली प्रतिष्ठाने सकाळपासून बंद ठेऊन आपले सहकार्य दर्शविले तर आयोजित केलेल्या मूक मोर्चाला तालुक्यातील महिला आघाडी,युवा मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत सामान्य जनतेनी हजारोच्या संख्येने उपस्थितीत राहून आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे समर्थनार्थ आपला पाठिंबा दिला. मा.आमदार साहेबांवरील गुन्हे त्वरित मागे घेण्यासंदर्भात मा.मुख्यमंत्री याचे नावे निवेदन मा.पोलिस उपनिरीक्षक शेंडे साहेब व मा.पोलिस उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी मिलिंद शिंदे साहेब यांना दिले गेले. आणि त्वरित गुन्हे मागे न घेतल्यास यापेक्षाही उग्र असा आक्रोश मोर्चा काढण्याची चेतावनी भारतीय जनता पार्टी तर्फे केली गेली.
मूक मोर्चा मध्ये इंदुताई आंबोरकर तालुकाध्यक्ष महिला आघाडी,देवानंद बावनकर तालुकाध्यक्ष भाजयुमो , गणेश तर्वेकर उपाध्यक्ष न.प.,जगदीश सडमाके तालुका महामंत्री,शिरीष वानखेडे माजी नगरसेवक,दशरथ उके माजी नगरसेवक,सुनील शिवणकर तालुका महामंत्री,राजेश घिये जि.प.प्रमुख,धनराज बावनकर जि.प.प्रमुख,रमेश बोरकर जि.प.प्रमुख, ईश्वरजी कामडी,रमेश ग.बोरकर,सुधाकर कामडी, जिवेश सयाम,नरेंद्र खोब्रागडे,सोनू नंदनवार,अरविंद नागपुरे,परमानंद गहाणे,केदार मेश्राम,बालुभाऊ कामडी,दिलीप कामडी,हेमंत नन्नावरे,राजू पिसे,गिताताई बोरकर,उज्वला माटे,पद्माताई कामडी,मंदाताई कश्यप,वर्षा शिरबांधे,संगीता गहाणे,वंदना पराते,सुनिता मदनकर,सुनंदा मदनकर तथा सर्व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि जनतेनी आपली उपस्थिती दर्शविली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!