नारीशक्ती महिला मंडळ तर्फे महिला दिन साजरा



प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल

 नारीशक्ती महिला मंडळ तर्फे महिला दिन साजरा करण्यात आला. इको पार्क येथे संसार सांभाळणाऱ्या सामान्य महिलांनी महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून इको पार्क येथे महिला दिनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये चिट्टी स्पर्धा ठेवली होती चिट्टी उघडल्यानंतर चिट्ठी मध्ये जे लिहिलेलं असेल ते करून दाखवणे किंवा म्हणून दाखवणे हे प्रत्येक स्त्रीने अगदी आनंदाने प्रतिसाद देत स्पर्धा पूर्ण केली. या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच की महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि महिलांना स्टेज डेरिंग यावी. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारी शक्ती महिला मंडळच्या सर्व स्त्रियांनी सहकार्य केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!