नवभारत कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी अल्का राजमलवार
मूल येथील नामांकित नवभारत कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी श्रीमती अल्का राजमलवार (येरोजवार) यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारलेला आहे.
शिक्षण प्रसारक मंडळ मूल चे अध्यक्ष एडवोकेट बाबासाहेब आसाडे यांनी श्रीमती राजमलवार यांची नियुक्ती केली आहे. शाळेचे पर्यवेक्षक सुधाकर पुराम यांचे सह शिक्षक शिक्षिका यांनी त्यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
नवभारत कन्या विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका मंगला सुंकरवार या नियतवयोमानाने सेवानिवृत्त झाल्याने त्यांचे जागेवर श्रीमती राजमलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमती राजमलवार यांचे नवभारत कन्या विद्यालय चे शिक्षक, शिक्षिका यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि अभिनंदन केले आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!