चारगाव धरण,निमडला तलावाचे खोलीकरण, सौंदर्यीकरण करा ...



अभिजीत पावडे यांची मागणी...  



वरोरा.....जगदीश पेंदाम

तालुक्यातील येत असलेल्या चारगाव धरणाची तसेच निमडला तलावाचे खोलीकरण, सोंदरीकरण करण्याची मागणी आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी  उपसभापती चारगाव अभिजीत पावळे यांनी केली आहे....
वरोरा चिमूर राष्ट्रीय 353 मार्गावर तालुक्यातील सर्वात मोठे चारगाव धरण असल्याने पावसाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचे तसेच पावसाळ्यात ओव्हर फ्लो जाणारे पाण्यामुळे पूर परिस्थिती नेहमीच परिसरातील शेतामध्ये निर्माण होत असते तसेच या धरणाचे पाणी चंद्रपूर येथे ईरइ डॅमला जाण्याकरीता चंदई नहर,ईरइ नाला तयार करण्यात आला मात्र अनेक वर्षापासून या नाल्याचे खोलीकरण करण्यात आलं नसून पावसाळ्यामध्ये परिसरातील दादापुर, मानोरा, धानोली, चंदनखेडा, आजगाव, पाचगाव, अर्जुनी, चारगाव खुर्द, चारगाव बुद्रुक आदी गावातील शेती पुरेपूर ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांना तलावाच्या ओवर फ्लो पाण्यामुळे शेती पिकांचे नेहमीच नुकसान सहन करावा लागतो तसेच चारगाव धरणामध्ये अनेक वर्षापासून गाळ साचुन असल्यामुळे चारगाव धरणाची उंची कमी झाली असून परिसरातील गावांमध्ये पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प पडत असते तसेच त्याच मार्गावर जवळच असलेल्या रामदेगीकडे जाणारा रस्त्यावर निमडला तलाव असुन याला लागूनच चंदई नहर असून यातील पाणी परिसरातील अर्जुनी तुकुम, कोकेवाडा तुकूम किनारा, आष्टा, मानकर कोकेवाडा,विलोळा, वडाळा,काटवल ,अनेक गावातील पशेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी सोडण्याचा काम केले जात असल्याने जवळपास ओलीताखाली सहा हजार हेक्टर शेतजमीन येत असून निमडला तलावाची व चंदन नहराची मागील 40 वर्षापासून खोलीकरण व दुरुस्ती करण्यात आली नसल्यामुळे ठीकठिकाणी नहराला भेगा,भगदाड पडलेल्या असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पावसाळ्यातील ओव्हर फ्लो पाण्यामुळे नुकसान सहन करावा लागतो....
 
चारगाव धरणाचं पाणी मोठ्या प्रमाणात वरोरा व चिमूर तालुक्यातील गावांमध्ये पिण्यासाठी वापर करण्यात येत असून उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईसाठी दोन्ही तलावाचे खोलीकरण व सौंदर्यरीकरण करणे आवश्यक असल्याने संबंधित विभागाने, लोकप्रतिनिधी, प्रशासनाने त्यासाठी काही उपाययोजना करून पाण्याची साठवणूक क्षमता वाढवावी यापासून  परिसरातील दादापुर, मानोरा .धानोली. चंदनखेडा. अर्जुनी. चारगाव खुर्द. चारगाव बु. कोकेवाडा तुकून,किनारा, आष्टा, मानकर कोकेवाडा, आजगाव, पाचगाव, विलोळा, वडाळा, काटवल ईतर गावातील शेती पुरेपूर ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांना बारमाही उत्पादन वाढवण्यात योग्य असा फायदा होईल....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!