महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला पाणी शुद्धीकरण व शितकन यंत्र भेट.
तळोधी बा.;
साफेक्स केमिकल्स इंडिया लिमिटेड या कृषी क्षेत्रातील अग्रगण्या भारतीय कंपनी कडून सामाजिक बांधिलकी जपत व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (C.S.R. Activity) या उपक्रमा अंतर्गत महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तलोधी (बाळापूर) ला दिनांक १४/०३/२०२३ रोजी पाणी शुद्धीकरण व शीतकरण यंत्र भेट देण्यात आले
या प्रसंगी साफेक्स केमिकल्स इंडिया लिमिटेड या कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक मा. श्री. अभयजी जिभकाटे विक्री अधिकारी श्री. नितीन पाटील प्रतिनिधी हितेश लोणारे विवेक कृषी केंद्र तलोधी चे संचालक श्री. नितीन पाकमोडे मनीष फर्टीलायझर अँड पेस्टीसाईड्स तलोधी चे संचालक श्री. प्रदीप सहारे महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा.श्री. ए. एन. कोराणे सर, पर्यवेक्षक मा. श्री. पि. एम. कोहरे सर मा. श्री. विनायक घुगुस्कर सर आदी उपस्थित होते.
या प्रसंगी कल्याण शिक्षण संस्था नागपूर चे अध्यक्ष मा. श्री. उन्मेषजी गेडाम साहेब सरचिटणीस मा. सौ. मालतीताई गेडाम मॅडम प्राचार्य मा. श्री. जी.जे. बुलबुले सर यांनी आभार व्यक्त केले
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. गणेश उगेमुगे सर यांनी केले
याप्रसंगी महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!