जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन व सॅनिटरी पॅडचे वाटप



तलोधि बा.;
    येथून जवळच असलेल्या कोजबी(चक) येथील सरस्वती विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिला  मार्गदर्शन व सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
     या दिनाचे औचित्य साधून १२ ते ४५ वयोगटातील महिलांना जनकल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था नवरगाव तर्फे  सॅनिटरी  पॅडचे वाटप करण्यात आले.
       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी से.नि. मुख्याध्यापिका कलाताई गोंदे, उद्घाटक जनकल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था नवरगावच्या सचिव मनीषाताई बारापात्रे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प. सदस्या पद्मा कामडी, सुलोचना बोकाडे, डाॅ.स्वप्नील कामडी, रेखाताई बारापात्रे, गीताताई बारापात्रे, वनरक्षक पुजा नरुके,पल्लवी कामडी, आरोग्यसेविका प्रतिभा भाकरे उपस्थित होत्या.
       याशिवाय येनोली, पुलगाव,वैजापूर, चारगाव चक, चारगाव माना येथीलही महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.  कार्यक्रमाचे संचालन स्मिता पर्वते तर आभार शीतल मेश्राम हिने मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!