खेडी येथे विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाने महिला दिन साजरा
- गावभोजनासह सणोत्सवाचे चौथे वर्ष
सावली (प्रतिनिधी) - जगात महिला विविध क्षेत्रात पुढे जात असतांना खेड्यातील महिलाही मागे कसे राहणार. जागतिक महिला दिनानिमित्त खेडी येथील महिलांनी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला. विशेष म्हणजे 4 वर्षांपासून गावभोजनासह गावात सण साजरा करण्यात येतो.
सावली पासून जवळ असलेल्या खेडी येथे 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सकाळी गावातून महिलांची लेझीमसह फेरी काढण्यात आली. महिलांची दौड स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, कबड्डी स्पर्धा घेण्यात आले. महिलांचे मार्गदर्शन व चर्चासत्रात आपल्या भावना व्यक्त केल्या. रात्रौच्या सुमारास वयक्तिक नृत्य, समूह नृत्य, गीतगायन, कलापथक अशा कला महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून साजरा केले. यावेळी स्पर्धेत प्राविण्य मिळविणाऱ्या महिलांना पारितोषिक देण्यात आले. दिवसभरात सणाचे स्वरूप गावात होते. सामूहिक गावभोजनही करण्यात आले हे महिला दिनाचे 4 थे वर्ष आहे. कार्यक्रमाचे आयोजन गावातील महिला बचत गट करतात तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही महिलाच करतात. शेतकरी, कष्टकरी महिला आपला संसार सांभाळीत अशाप्रकारे उत्तम महिला दिन साजरा करीत असल्याने त्यांचे परिसरात कौतुक केल्या जात आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!