कुकडहेटी येथे "महिला दिन "व सत्कार समारंभ संप्पन्न



सिंदेवाही (तालुका प्रतिनिधी )
आज दि.8 मार्च 2023 रोज बुधवार ला कुकडहेटी येथे सावित्रीबाई महिला ग्रामसंघ व आय.सी.आय.सी.आय. फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला, कार्यक्रमाचे उदघाटक कु. सोनाली ज्ञानवल मॅडम मुख्यध्यापिका जि.प. प्रा. शाळा कुकडहेटी,कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. रंजना चौधरी पर्यवेक्षिका, प्रमुख पाहुणे -सौ. उज्वला तोरणकर उपसरपंच ग्रा. पं. कुकडहेटी, सौ. उष्या जांभुळे ग्रामसंघ अध्यक्षा, सौ. रंजनाताई जांभुळे ग्रामसंघ सचिव, सौ. वंदना भोयर ग्रामसंघ कोष्याध्यक्ष, श्री सतीश सामृतवार   विकास अधिकारी (ICICI फाउंडेशन)श्री शांताराम आदे (CF)ICICI फाऊंडेशन, सौ. लताबाई गरमळे ग्रा. पं. सदस्या, श्रीमती कविता धारणे जलसिंचन विभाग कुकडहेटी, सुरेखा गायकवाड(ICRP)नलेश्वर,भारती वाघमारे (CTC)यांनी  जागतिक दिनाचे महत्व आपल्या मार्गदर्शनातून महिलांना पटवून दिले, सत्कारमूर्ती कु. ज्ञानवल मॅडम यांचे सत्कार ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ. उषा जांभुळे, सचिव सौ. रंजना जांभुळे यांनी केले, आजपर्यँत जि. प. प्राथमिक शाळा कुकडहेटी येथे नवोदय करिता 11मुलांना पात्र करून शाळेच्या भौतिक विकासाकरिता मॅडम ने परिश्रम घेऊन मुलांना घडविण्याचे काम केले असून त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे औचित्य साधून करण्यात आला,मुलांचे वेगवेळे कार्यक्रम, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, बक्षीस वितरण करण्यात आले,कार्यक्रमाचे संचालन सौ. रेखाताई चौधरी (ICRP)यांनी केले, प्रास्ताविक सौ. सुरेखाताई गायकवाड (ICRP)यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. दिपाताई धारणे अंगणवाडी सेविका यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!