सर्वसामान्य ओबीसीच्या घरात घुसून आमदार बंटी भांगडिया व सहकार्यकर्त्यांनी मारहाण केलेल्यांना त्वरित अटक करावे उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर यांना तालुका काँग्रेस कमिटी तर्फे दिले निवेदन
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमूर येथील रहिवासी साईनाथ बुटके यांनी व्हॉट्सअप व फेसबुक वर आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या विरोधात एक पोस्ट वायरल केली असे समजून रागाच्या भरात कायदा हातात घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करीत साईनाथ बुटके यांच्या राहते घरी जाऊन अश्वमेघ उर्फ साईनाथ बुटकेला मारहाण केली त्यांच्या पत्नी सोडविण्यासाठी गेली असता आमदार बंटी भांगडिया यांनी त्यांचे डोक्याचे केस पकडून हात पकडून वरतून घासत खाली आणले अशी तक्रार दाखल केल्यावरून पोलिसांनी भादवी १४३,१४७,१४९,४५२,३२३,३५४,२९४ , त्यानुसार गुन्हा दाखल केला वरील प्रकरणात आमदार भांगडिया यांनी साईनाथ बुटके यांची पोलीस तक्रार न करता कायदा हातात घेऊन बुटके पती-पत्नीला मारहाण केली त्यानंतर आमदार बंटी भांगडिया यांनी ठिक - ठिकाणी फोन करून ५०० ते ७०० लोकांचा जमाव पोलीस स्टेशनवर आणून चिमूर येथील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला व प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.यापूर्वी सुद्धा अनेकदा आमदार बंटी भांगडिया यांनी बडाचा वापर करून सत्तेचा दुरऊपयोग करून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार महोदयांना अटक करण्यासाठी माननीय अध्यक्ष विधानसभा मुंबई यांची लवकरात लवकर अनुमती घेऊन अटक करावी व बाकी गुन्हेगारांना त्वरित अटक करावी.
तसेच सन २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचारक पोलिसला लाथ मारणे व विधानसभा निवडणूक सन २०१९ ला शंकरपूर येथे गाड्या आडव्या करून निवडणुकीत उभे असलेल्या विरोधी उमेदवाराला धमकाविणे व निवडणूक प्रचारात विरोधी उमेदवाराच्या मागे व कार्यकर्त्यांच्या मागे गाड्या लावणे आमदार भांगडिया यांनी राजस्थानमध्ये सुद्धा पोलिसांची हुज्जत बाजी केली होती. या प्रकारे दहशत तयार करणे असा प्रकार केलेला आहे. या संदर्भात गुन्हा दाखल सुद्धा झालेला आहे. करीता उपविभागीय पोलिस अधिकारी यांना आज माजी मंत्री तथा सरचिटणीस महारष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माजी आमदार डॉ.अविनाशभाऊ वारजूकर, यांच्या उपस्थितीमध्ये तालुका काँग्रेस कमिटी तर्फे निवेदन देण्यात आले.यावेळी समन्वयक चिमूर विधनसभा डॉ. सतिशभाऊ वारजुकर,महाराष्ट्र प्रदेश सेवादल सरचिटणीस प्रा. राम राऊत सर, तालुका अध्यक्ष विजयजी गावंडे पाटील, शहर अध्यक्ष अविनाश अगडे, तालुका सचिव विजयजी डाबरे,सेवादल तालुका अध्यक्ष किशोरजी शिंगरे,प्रदीप तर्वेकर,जेष्ठ नेते धनराज मालके, माधवजी बिरजे, कदीर शेख,ओम भाऊ खैरे,विलास डांगे, रहेमान पठान,पप्पू शेख,अशोक दूधनकर, विलास पिसे,दीपक कुंभारे, घनश्याम रामटेके,राजू दांडेकर, बबलू शेख,सुभाष बन्सोड, नितीन कटारे, राकेश साटोणे,संतोष भैसारे,अक्षय लांजेवार,व आदी कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!