भगवान श्री श्रीकृष्ण शिक्षण महाविद्यालय तळोधी (बा)येथे "युवारंभ 2023" संपन्न

भगवान श्री श्रीकृष्ण शिक्षण महाविद्यालय तळोधी (बा)येथे "युवारंभ 2023" संपन्न._
*््
तळोधी (बाळापुर) वार्ताहर

             स्थानिक भगवान श्री श्रीकृष्ण शिक्षण महाविद्यालय तळोधी (बाळापुर) येथे नुकताच " युवारंभ 2023" हा विशेष क्रीडा व सांस्कृतिक सोहळा संपन्न झाला.      
             "युवारंभ 2023" या क्रीडा व सांस्कृतिक सोहळा समारोपिय व बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उन्मेषजी गेडाम ,अध्यक्ष- कल्याण शिक्षण संस्था, नागपूर हे लाभले होते तर प्रमुख मार्गदर्शक व बक्षीस वितरक म्हणून मालतीताई उन्मेषजी गेडाम सरचिटणीस- कल्याण शिक्षण संस्था ,नागपूर उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य जी. जे. बुलबुले ,प्राचार्य-महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळोधी, मा.एस.टी.सेलोकर माजी प्राचार्य- महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळोधी , प्रा डॉ. रजनी दिवाकर शिवणकर, कार्यकारी प्राचार्य- भगवान श्री श्रीकृष्ण शिक्षण महाविद्यालय  तसेच प्रा.अतुल एन. कामडी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
             "युवारंभ 2023" या क्रीडा व सांस्कृतिक सोहळ्याच्या समारोपीय कार्यक्रमाची सुरुवात गोंडवाना विद्यापीठ गीताने तसेच कै पंडित डॉ. तु.वि. गेडाम, संस्थापक अध्यक्ष-कल्याण शिक्षण संस्था, नागपूर यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.समारोपीय कार्यक्रमामध्ये क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या बी.एड. (दिवार्षिक अभ्यासक्रम) छात्रध्यापकांचा गुणगौरव  शील्ड,मेडल, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सांस्कृतिक स्पर्धांमध्ये एकपात्री प्रयोग, लघु नाटिका, एकलनृत्य ,समूह नृत्य ,गीत गायन ,संगीत वाद्य वादन,अंताक्षरी, पुष्पगुच्छ सजावट, रांगोळी स्पर्धा ,पदार्थ थाळी सजावट, विज्ञान मॉडेल प्रदर्शनी आणि  क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी ,हॉलीबॉल, क्रिकेट, रस्सीखेच ,लगोरी, 400 मीटर दौंड, कॅरम, बुद्धिबळ, गोळा फेक ,थाळीफेक इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. समारोपिय कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी छात्रध्यापकांना यथोचित मार्गदर्शन केले.
         "यु्वारंभ 2023" या कार्यक्रमाच्या समारोपिय कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. शुभांगी वीरेंद्र पाकमोडे यांनी केले. तर बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. रजनी दिवाकर शिवणकर यांनी व आभार प्रदर्शन प्रा. सोनाली चेकबंडलवार यांनी केले कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाला कल्याण शिक्षण संस्थेच्या सर्व शैक्षणिक शाखांचे विभाग प्रमुख तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक ,कर्मचारी व छात्रध्यापक  उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!