चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील १०२ च्या दोन्ही रुग्ण वाहिका बंद


गरोदर मातेला नाहक त्रास

उप संपादक
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चिमूर तालुका हा नवाजलेला शहर म्हणून ओळख आहे. भारताला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर चिमूर या गावास स्वातंत्र्य मिळाले इंग्रजांना पळवून लावले. तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे राष्ट्रीय प्रकल्प झाले असून देश विदेशातील पर्यटक व्याघ्र दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. चिमूर वरून चंद्रपूर जिल्ह्याचे अंतर १०० कि.मी. इतके आहे. रुग्णास रेफर दिल्यानंतर वाटेतच रुग्णास जीव गमवावे लागत असते. म्हणून चिमूर जिल्हा व्हाव्हा याकरिता आमदार,पालकमंत्री, चिमूर जिल्ह्याची मागणी वारंवार करीत असतात. असे असतांना सुद्धा चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील १०२ च्या दोन्ही रुग्ण वाहिका बंद असने हि फार मोठी शोकांतिका आहे. वैधकीय अधीक्षक यांनी याबाबतची माहिती वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांना कळवून दोन्ही १०२ रुग्ण वाहिकेची दुरुस्ती करावी अन्यथा नावाजलेल्या चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे रुग्णांनी पाठ फिरविल्यासारखे दिसून येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!