धडक सिंचन विहीर योजनेचे लाभार्थी अजूनही वंचित
वर्क ऑर्डर मंजूर असतांना निधी अभावी विहीर नाही
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - लाभार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरुन पंचायत समित्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांना सिंचन विहीर उपलब्ध करुन देण्यासाठी विचार केला जातो. सिंचन विहिरी कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांच्या नावावर कमीत-कमी ०.६० हेक्टर जमीन असावी लागते.मागेल त्या शेतकऱ्यास विहीर असा नारा आहे. परंतु २०२० या वर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात एकूण धडक सिंचन विहीरी १७०० मंजूर आहेत त्यापैकी ३६ विहिरी चे काम काम पूर्णत्वास आहे.यास एकूण खर्च प्रत्येकी १ विहीर २ लाख ५० हजार रुपये इतके आहे. तर ३६ विहिरी करीता २ टप्प्यात एकदा ७५ लक्ष व दुसऱ्या वेळेस १५ लक्ष असे एकूण ९० लक्ष रुपये शासनाकडून पंचायत समिती चिमूर सिंचाई उप विभागास प्राप्त झाले परंतु अजूनही १६६४ धडक सिंचन विहिरीचे शेतकरी लाभार्थी या लाभापासून वंचित असल्यामुळे कडक उन्हाळ्यास सुरुवात झाली असतांना विहीर आता नाही तर पावसाळ्यात तयार करायची काय ? अशा प्रश्नार्थक विचाराने शेतकरी दैनंदिन पंचायत समिती गाठून अधिकाऱ्यांना विचारणा करीत असतात याकडे स्थानिक आमदार तथा पालकमंत्री व मुख्यमंत्री,कृषी मंत्री याबाबत कसलीही चर्चा करायला तयार नाहीत म्हणून याची वाचा पुढे कुठला विरोधी पक्ष मांडणी करेल काय याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!