वाघाच्या हल्यात 4 वर्षाचा बालक ठार - सावली तालुक्यातील घटना विजय सिध्दावार


वाघाच्या हल्यात 4 वर्षाचा बालक ठार - 
सावली तालुक्यातील घटना
    चंद्रपूर जिल्ह्यातील बोरमाळा तालुका सावली येथील हर्षल संजय कारमेगे वय 4 वर्ष  हा मुलगा  घराचे अगदी समोर आई सोबत असताना वाघाने हल्ला करून उचलून नेले... बाळाचे आईने आरडाओरड केली परंतू वाघ बाळाला घेऊन पसार झाला... पोलीस विभाग, वनविभागाचे कर्मचारी बाळाचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. वडील मिरची तोडणीसाठी आंध्रप्रदेशात गेला असून एकच मुलगा होता. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!