रेती भरलेला ट्रक पलटून दोघांचा जागीच मृत्यू
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - शंकरपूर ते भिसी रस्त्यावरील आसोला गावाजवळ गोसेखुर्द नहर मध्ये ट्रक पलटी झाल्याने दोघाजणाचा जागीच मृत्यू झाला असून ही घटना सोमवारी सकाळी सात ते आठ वाजता च्या दरम्यान घडली.शंकरपूर पासून एक किलोमीटर अंतरावर गोसेखुर्द नहर आहे या नहरावर पूल बांधला असून पुलिया जवळच वळण मार्ग आहे त्यामुळे उमरेड येथील ठेकेदार चा रेती भरलेला हायवा ट्रक ब्रह्मपुरी वरून येत असताना या हायवा ट्रकचे संतुलन सूटल्याने पूल तोडून सदर हायवा ट्रक हा नहरामध्ये जाऊन पडला नहराचे काम परिपूर्ण न झाल्यामुळे तिथे पाण्यासाठी गड्डा खोदलेला होता त्या गड्ड्यामध्येच ट्रकची केबिन सह हे दोघेही जण दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला यात ट्रक ड्रायव्हर दीपक इंद्र दीप वय 28 वर्षे तर वाहक प्रताप शिवकुमार राऊत 26 असे मृतकाचे नाव असून हे दोघे ही उमरेड तालुक्यातील सुरगाव येथील रहिवासी आहेत उमरेड येथून क्रेन आणून ट्रक काढण्यात आला.तर शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आला.तसेच भरदाव वेगाने हे रेती भरलेले वाहन चालत असल्याने बरेच अपघात झालेले आहे त्यामुळे रस्त्यावरील रेती भरलेले वाहतूक करणारे ट्रकवर हायवावर कारवाई करावी अशी परिसरातल्या जनतेची मागणी होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!